प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर - जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून राज्य रक्त संक्रमण परिषद महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग मुंबई व रक्तकेंद्र सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर* यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वैच्छिक रक्तदान चळवळीस प्रेरक रक्तदाते व रक्तदान शिबीर आयोजक संस्थांचा भव्य सत्कार समारंभ दि.१८/०६/२०२१ रोज शुक्रवारला प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला होता.
मागील अनेक वर्षापासून आम्हा सर्वांचे मार्गदर्शक व भाजपा ज्येष्ठ नेता वनविकास महामंडळ, महाराष्ट्र राज्यचे माजी अध्यक्ष मा.श्री चंदनसिंह चंदेल यांच्या वाढदिवस निमित्त दि.०७ एप्रिल ला जीवनदान रक्तदायीनी समिती, बल्लारपूर च्यावतीने रक्तदान शिबिर आयोजित केल्या जाते. या शिबिरात बल्लारपूर शहरातीलच नाही तर संपूर्ण तालुक्यातून रक्तदाते आपल्या स्वइच्छेने मोठ्या संख्येने रक्तदान करतात. या कोरोना महामारी च्या कठीण काळात देखील हे रक्तदान शिबिर कोरोना नियमांच्या अधीन राहून उत्स्फूर्तपणे पार पडले. हे आयोजन यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता शहराचे नगराध्यक्ष मा.श्री हरीश शर्मा,भाजपा - शहराध्यक्ष श्री काशिनाथ सिंह, भाजपा नेते - श्री शिवचंद दिवेदी, श्री निलेश खरबडे, श्री समीर केने, सौ.रेणुका दुधे, सौ.मीना चौधरी, श्री विश्वजीतसिंह चंदेल, श्री सतविंदरसिंग डारी,श्री येलय्या दासरफ, श्री श्रीनिवास संचूवार,श्री भरतसिंह ठाकुर, श्री गुलशन शर्मा, सौ. वैशाली जोशी, सौ.कांता ढोके,शहर महामंत्री श्री मनीष पांडे, शहर उपाध्यक्ष - श्री श्री मंजितसिंग कालरा,श्री राजू दासरवार, शहर सचिव- इंजि. देवेंद्र वाटकर, सतीश कणकम, युवा मोर्चा अध्यक्ष ॲड. रनंजय सिंह,भाजपा नगरसेवक व नगरसेविका - सौ सुवर्णा भटारकर, सौ जयश्री मोहुर्ले, सौ आशा संगीडवार, सौ सारिका कणकम, सौ पुनम मोडक, सौ साखरा बेगम,श्री महेंद्र ढोके, श्री गणेश बहुरिया, श्री राकेश यादव, श्री स्वामी रायबरम
युवा नेते - श्री किशोर मोहुरले, श्री विकास दुपारे ,श्री अरुण भटारकर, श्री शिवभोला खेंगर, श्री बिरेंद्र श्रीवास, श्री नरेश बहुरिया, श्री नीरज झाडे,श्री रोहन तोकल,श्री प्रमोद रामिल्लावार, श्री सुरेन्द्रसिंह खडका,श्री प्रभदीप सचदेवा, श्री घनश्याम बुरडकर, श्री बबलू गुप्ता ,श्री नफीस अन्सारी, श्री सरोज सिंह, श्री हरीबाबु लंका, श्री विशाल शर्मा, श्री ऋषीपाल गेहलोत, श्री श्रीकांत आंबेकर, श्री सलीम अहमद,श्री आबिद अली, श्री पुनमचंद बहुरिया तथा समस्त भाजपा आजी-माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक, माजी नगरसेविका आणि कार्यकर्ता मोठ्या प्रमाणावर प्रत्येक वर्षी मेहनत घेतात.
आजचा हा सत्कार जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.संध्याताई गुरनुले यांच्या हस्ते स्वीकारताना या सगळ्यांची आठवण मनात होती व हा सत्कार एकटा माझा नसून संपूर्ण जीवनदान रक्तदायिनी समितीचा आहे असे माझे ठाम मत आहे. हा सत्कार पूर्णता मी जीवनदान रक्तदायिनी समिती, बल्लारपूर ला समर्पित करतो व भविष्यातही आम्ही हा उपक्रम असाच अविरल राबवत राहू असा विश्वास यावेळी मी व्यक्त करतो. याप्रसंगी या उपक्रमाकरिता प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष हातभार लावणारी मंडळी व समस्त रक्तदात्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो.