चंद्रपूर - संपूर्ण देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू आहे. जानेवारी महिन्यापासून आधी ४५ वर्षावरील व नंतर १८ ते ४५ या वयोगटातील नागरिकांची लसीकरण मोहीम महाराष्ट्र सरकार तर्फे सुरू संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे परंतु या संपूर्ण लसीकरण मोहिमेची माहिती घेतली असता असे लक्षात आले की महिलांच लसीकरण पुरुषांच्या तुलनेत कमी झालेले आहे आणि हे जवळ जवळ निम्मे आहे. म्हणून महिलांच लसीकरण वाढण्यासाठी महिलांचे स्वतंत्र लसीकरण केंद्र स्थापन करण्यात यावे त्याच सोबत महिला लसीकरणा संबंधी शासकीय स्तरावरून जनजागृती व्हावी या मागणी साठी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन, आपप्ती व्यवस्थापन, बहुजन कल्याण व पालकमंत्री चंद्रपूर विजय वडेट्टीवार यांना आज निवेदन दिले. गेल्या आठ मार्चला जिल्ह्यामध्ये महिला दिनानिमित्त स्वतंत्र लसीकरण केंद्र स्थापन करण्यात आले होते त्याच पार्श्वभूमीवर महिलांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र स्थापन करण्यात यावे अशी मागणी या निवेदनातून महिला काँग्रेस च्या प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी केली आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्षा सुनीता धोटे, जिल्हा उपाध्यक्षा हर्षा चांदेकर, ब्लॉक अध्यक्षा शीतल काटकर, शहर सचिव वाणी डारला, शहर उपाध्यक्षा स्वाती त्रिवेदी, सदस्य लता बारापात्रे, पायल खांडेकर उपस्थित होत्या.
हे ही वाचा
Tags:
Chandrapur