चंद्रपूर - महाराष्ट्र, जिल्हा,व शहर अनुसूचित जाती विभाग तर्फे माननीय खासदार राहुलजी गांधी यांच्या वाढदिवस संकल्प दिन म्हणून साजरा करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ,प्रदेशध्यक्ष मा.आमदार नानाभाऊ पटोले यांनी दिले होते तसेच आमचे राष्ट्रीय नेतृत्व अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभग चे अध्यक्ष डॉ नितीनजी राऊत, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विजय अंबोरे जी,व चंद्रपूर जिल्याचे पालकमंत्री मा. ना. विजयभाऊ वडेट्टीवार , महाराष्ट्र चे एकमेव खासदार बाळू भाऊ धानोरकर , आमदार सुभाषभाऊ धोटे व आमदार सौ. प्रतिभाताई धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी (अनुसूचित जाती विभाग ) नेतृत्वाखाली गांधी चोक , महानगर पालिका चंद्रपूर च्या कार्यालयासमोर पेट्रोल, डिझेल, गॅस, महागाई व शेतकरी काळ्या कायद्या विरोधात आंदोलन करण्यात आले. "राहुलजी को लाना है, देश के बचाओ।"असा संकल्प करून वाढदिवस साजरा करण्यात आला. या वेळी जिल्हा शहर अध्यक्ष रामूभाऊ तिवारी क्रु. उ. बा. स. चे सभापती दिनेशभाऊ चोखारे ,प्रदेश उपाध्यक्ष आश्र्विनी खोब्रगडे जिल्हाध्यक्ष पवनकुमार आगदारी ,महिला जिल्हाध्यक्ष अंनुताई देगावकर , शहर अध्यक्ष कुणाल रामटेके, महिला शहर अध्यक्ष शालिनी भगत ,जिल्हाउपध्यक्ष सुनील पाटील ,प्रदेश सचिव महिला काँग्रेस नम्रता ठेमस्कर, वाणी दरला, स्वाती त्रिवेदी,लता काटकर, आशा रामटेके,अलका देवगडे, पायल दुर्गे,शीतल दातार गिरीजा बाई शंभरकर,घुग्घुस शहर अध्यक्ष सुरज बहुराशी, दिपक दुर्ग, वतन अट्टेला, इरपन शेख, योगेश दुर्ग, प्रितम अट्टेला, शुभम कुम्मरवर, अक्षय कोल्हे, व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काँग्रेस चे नेते खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कडून गरजूंना भोजनदान
अखिल भारतीय काँग्रेस चे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस व महानगरपालिकेच्या महिला नगर सेविका यांच्या सौजन्याने स्थानिक महाकाली मंदिर परिसरातील गरजूंना भोजनदान करण्यात आले. या वेळी सर्व महिला पदाधिकर्यांनी स्वतः च्या हाताने डब्बे करून आणले व गरजूंना वितरित केले. या वेळी महिला काँग्रेस च्या प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर,एकोरी वॉर्ड प्रभाग १० च्या नगरसेविका वीणा खनके, सकिना अन्सारी,जिल्हा उपाध्यक्षा सुनीता धोटे, जिल्हा उपाध्यक्षा हर्षा चांदेकर, ब्लॉक अध्यक्षा शीतल काटकर, शहर उपाध्यक्षा स्वाती त्रिवेदी, सचिव वाणी डारला, सदस्य लता बारापात्रे, चंदा वैरागडे, मीनाक्षी गुजरकर, सुष्मा नगराळे, वंदना खेळकर, पायल खांडेकर यांची उपस्थिती होती.