नागभीड/अनिकेत अगडे
सदर मृतक गुराख्याचे नाव खठू भानू कुंम्बले वय 65 वर्षे आहे, गुराखी नेहमी प्रमाणे आपली गुरे घेऊन जंगलात चरण्यासाठी गेला होता. त्यातच दबा धरून बसलेल्या वाघाने कंपार्टमेंट न 691 मध्ये गुराख्यावर हल्ला करीत ठार केले.
वन परिक्षेत्राधिकारी धोंडणे यांच्या पथकाणे सदर मृतक गुराख्याच्या कुटुंबाला 20000 रुपयांची तातडीची मदत केली.
शवविच्छेदना साठी मृतदेह नागभीड ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आले. पुढील तपास तळोधी वनविभाग व पोलीस विभाग करीत आहे.