बल्लारपूर :- बल्लारशाह रेल्वे स्थानकात RPF जवनाच्या तत्परतेने एका युवकांचे प्राण वाचले , बोगी मध्ये सामान चढवून चालू गाडीतून उतरतना एक युवक पाय घसरून पड़ला रुळा खाली जात असताना तेथे उपस्थित RPF च्या जवनाने त्याला खेचून त्याचा जिव वाचविला , ही घटना मंगळवारी रात्रि १२ वजन १० मिनीटाची आहे, सुरेश कुकरेजा सदर युवकांचे नाव आहे तर त्याला वाचवणाऱ्या रेलवे सुरक्षा दलाच्या जावांचे नाव सुनील पासवान असे आहे.
बल्लारशाह रेलवे स्थानकावर फलाट क्रमांक ५ वर मंगळवारी रात्रि अहमदाबाद कड़े जाणारी नवजीवन एक्सप्रेस या गाडीने आपल्या कुटुंबास सोडण्यासाठी सुरेश कुकरेजा आले व सामान बोगी मध्ये चढवू लागले , एवढ्यात गाड़ी सुरु झाली व उतरतना ते घसरून पडले , रुलाखाली जाणार तेवढ्यात तिथे उभे असलेले रेलवे सुरक्षा दलाचे जवान सुनील पासवान यांनी त्याला ओढून चलत्या ट्रेन पासून दूर केले व त्याचे प्राण वाचवले , या घटनेत सदर युवकास डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे.
RPF चे जवान सुनील यांनी केलेल्या कामगिरी व तत्परतेचे सर्व स्तरा वर प्रशंसा केली जात आहे.
