बल्लारपूर - दिनांक 24/06/2021 रोजी पोलीस ठाणे बल्लारशा येथील पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभागातील सपोनि गायकवाड यांना खबऱ्याकडून गोपनीय माहिती मिळाली की एका कार मध्ये अंमली पदार्थाची वाहतूक होत आहे त्या प्रमाणे पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे मदतीने पंचासमक्ष सापळा रचला.
नवीन बस स्टॉप समोरून जाताना सदर कार ही मूलचंदानी किराणा स्टोर्स समोर मोकळ्या जागेत उभी असल्याचे माहिती मिळाली त्याठिकाणी छापा टाकला असता कार क्रमांक TS 02 FD 6090 मध्ये दोन इसम दिसून आल्याने कार ची झडती घेतली असता कार मध्ये एकूण 21 किलो 470 ग्राम गांजा किंमत 2,14,700/- रु कार TS 02 FD 6090 किंमत 2,50,000/- रु असा एकूण 4,64,700/- रु चा माल मिळून आला.
आरोपी नामे (1) जयपाल गोपाल एडला वय 37 रा. पेद्दपली (तेलंगणा) (2) हरीश सत्यम शामराव वय 33 वर्ष रा धर्मपुरी (तेलंगणा) यांना पोलीस स्टेशन येथे आणून त्यांचे विरुद्ध अप क्रमांक 714/ 2021 कलम 8 (क),20(ब)ii (क) NDPS Act अन्वये गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आली सदर कार्यवाही मध्ये उपरोक्त अधिकारी सपोनि मुलांनी PSI टेंभुर्णी , चांदोरे, मोहतरे पो हवा श्री जीवतोडे परचके, नापोशी श्री दांडेवार, कुडे, पाटील,वरघणे, पोशी डोरलीकर, पुरडकर, वाभीतकर, हेडाऊ, माने, चालक श्री ढवास,कैलास यांनी सहभाग घेतला.
