चंद्रपूर - दिनांक 19/6/2021 ला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष राजीव कक्कड ह्यांनी आयोजित केलेल्या प्रभाग अध्यक्ष व वॉर्ड अध्यक्ष आढावा बैठक मध्ये चंद्रपूर शहराचे निरीक्षक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते श्री प्रवीण कुंटे पाटील साहेब ह्यांच्या उपस्तिथी मध्ये सिद्धार्थ हॉटेल च्या हॉल मध्ये चंद्रपूर शहरातील सर्व प्रभाग अध्यक्ष आणि वॉर्ड अध्यक्ष ह्यांची बैठक घेतली
बैठकी मध्ये समोर होणाऱ्या महानगर पालिका निवडणुकीचे उद्दीष्ट ठेऊन चंद्रपूर शहरातील प्रत्येक वॉर्डात पक्ष मजबूत करण्यासाठी प्रत्येक वॉर्डात आणि प्रभागात पक्ष मजबुती करीता निरीक्षक कुंटे पाटील ह्यांनी आढावा घेऊन वॉर्डात कशाप्रकारे काम करायचे ह्य बद्दल सूचना देण्यात आल्या.
चंद्रपूर शहरातील पक्ष संघटन बघता वेळ आली तर आपण स्वबळावर निवडणूक पण लढू अशी सूचना वॉर्ड अध्यक्षांना व प्रभाग अध्यक्ष ह्यांना करण्यात आली.
आढावा बैठकीचे प्रास्ताविक करतांना शहर जिल्हा अध्यक्ष राजीव कक्कड ह्यांनी पक्ष संघटन बद्दल माहिती दिली.
आढावा बैठकीला विधानसभा अध्यक्ष सुनील काळे माजी शहर जिल्हा अध्यक्ष शशिकांत देशकर,शहर महासचिव धनंजय दानव,संभाजी खेवले उपाध्यक्ष चेतन धोपटे,निसार शेख ,दीपक गोरडवार,मनोज खंडेलवार, शहर सचिव नयन साखरे प्रवीण जुमडे तसेच प्रभाग अध्यक्ष व वॉर्ड अध्यक्ष उपस्तीत होते.
आढावा बैठकीत उपस्तीत झालेल्या मान्यवरांचे आभार विधानसभा अध्यक्ष सुनील काळे ह्यांनी आभार प्रदर्शन केले.