घुग्घुस - शहरातील शास्त्रीनगर परिसरात राहणारे आशिष वर्मा यांनी 20 जूनला गळफास घेत आत्महत्या केली.
4 वर्षांपूर्वी आशिष वर्मा व वैशाली कांबळे यांचा प्रेमविवाह झाला होता, लग्नांनातर वैशाली आपल्या आई-वडिलांच्या घरी पती सोबत राहत होती. आशिष व वैशाली ला 4 वर्षाची क्रिस्टी नावाची मुलगी आहे.
मात्र लग्नांनातर आशिष ला दारूचं व्यसन लागले त्यामुळे तो पत्नी वैशाली यांच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत होता या कारणाने पती-पत्नीमध्ये नेहमी भांडण व्हायचे.
वैशाली ही राजीव रतन रुग्णालयात सफाई कामगार म्हणून काम करते, 16 जून ला पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते, सततच्या भांडणाला कंटाळून वैशाली घर सोडून निघून गेली व रामनगर येथे राहणारी मैत्रीण अंजु नाहरकर यांच्या घरी रहायला गेली.
20 जून ला सकाळी नळ आल्याने वैशाली यांची आई सुवर्णा कांबळे ह्या सकाळी पाणी भरायला उठल्यावर आशिष यांच्या खोलीचा दरवाजा उघडा दिसल्याने त्यांनी आत बघितले असता आशिष ने पंख्याला गळफास घेत आत्महत्या केल्याचे दिसून आले.
त्यांनी तात्काळ वैशाली ला फोन करून सगळा प्रकार सांगितला, वैशाली ने घरी येऊन बघितले आशिष हा पंख्याला गळफास घेऊन लटकून होता, पत्नी वैशाली ने याबाबत पोलिसांना माहिती दिली की आशिष हा माझ्या चारित्र्यावर संशय घेत मारहाण करीत होता व दारूचे अतिव्यसन असल्याने त्याने कदाचित नशेत गळफास घेतला असावा असा अंदाज व्यक्त केला.
पुढील तपास घुग्गुस पोलीस करीत आहे.