चिमूर ::- शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व प्रल्हाद केशव अत्रे यानी शिवसेनीची स्थापना केली आज शिवसेना पक्षयाच्या 55 व्या वर्धापन दिनानिमित्य चिमूर तालुका शिवसेनाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे रक्तदान शिबीर घेऊन साजरा करण्यात आला.
गेल्या पाच दशकापासुन राज्याच्या राजकारनात व समाजकारनात महत्वाच्या व वेगवेगळ्या भुमिका बजावनारी शिवसेना आज 55 वर्षाची झाली, राज्यभर समाजपयोगी कार्यक्रम हा दिवस साजरा केला जातो, शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतरचा हा दूसरा वर्धापन दिन आहे.
या वर्धापन दिनाच् औचित्य साधुन शिवसेना जिल्हाप्रमुख नीतिन मत्ते यांच्या सूचनेनुसार शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमृत नखाते यांचे मार्गदर्शनात नेरी येथे शिवसेना चिमूर तालुकाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रक्तदान शिबीरचे आयोजन करण्यात आले होते शिबिरात 25 रक्तदातयानी स्वइचेने रक्तदान केले.
रक्तदान शिबिराचे उदघाटन प्राथमिक आरोग्य केंद्र नेरीचे वैधकीय अधिकारी डॉ, महेश मंगर, यांचे हस्ते करण्यात आले, उदघाटन प्रसंगि शासकीय रक्तपेढ़ी चंद्रपुरचे डॉ,गावित शिवसेना चिमूर तालुका प्रभारी श्रीहरी सातपुते, माजी विभाग प्रमुख बंडूजी पारखी,नेरी ग्राम पंचायतचे माजी उपसरपंच किशोर उकुंडे उपस्थित होते.
कार्यक्रम यशश्वी करण्याकरिता मंगेश अरुण मेश्राम, रामकिसन गेडाम, रोशन जुमड़े, अरुण पिसे, कवडू खेडकर, अजय बावने, विनोद उकुंडे, राजेश बावने, साकिन शेख, सनम सोनवाने, प्रीतम टेम्भूरने, रामकिसन गेडाम, विधा घूगुसकर, संगीत जीवतोडे यानी अथक परिश्रम घेतले.