चंद्रपूर - मागील 2 दिवसापासून ताडोबा मोहरली क्षेत्रातील मार्गावर 2 वाघ भ्रमण करीत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
त्यावेळी अनेकांनी त्या मार्गावर गर्दी करीत वाघांचे व्हिडीओ शूट केले, मात्र त्यामधील काहींनी वाघांचा रस्ता अडविल्याचे दिसत आहे.
त्यामुळे मोहर्ली चे वनपरिक्षेत्र अधिकारी मुन यांनी मार्गावर उभे असलेले व चित्रीकरण करीत असलेल्याना कारणे दाखवा नोटीस बजावले.
जर 2 दिवसात नोटीस मिळालेल्यानी आपली बाजू मांडली नाही तर त्यांचेवर वनअधिनियम 1972 कलम 9 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.