प्रतिनिधी/अनिकेत अगडे
तळोधी बाः ब्रिटिश कालीन घोडाझरी कालव्या अंतर्गत येत असलेल्या मुख्य वितरिकेवरील सोनापुर गावालगत असलेल्या कालव्यावरील पुल खचून गेलेला असताना सुध्दा पाटबंधारे विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांचे जीव धोक्याचे ठरले आहे.
या घोडाझरी कालव्याच्या सोनापूर गावालगत असलेला पुल क्र ४३ वर पाणी वाटप कमीजास्त करण्यासाठी तीन गेज बसविले होते. या पुलावरुन सोनापूरवासीयांना ये-जान करण्याकरिता सोयस्कर मार्ग होता .गाववासीय जनतेला या मार्गानेच ग्रामपंचायत कामासाठी तसेच अंगनवाडी व शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी हाच मार्ग सोयीस्कर असल्यामुळे गावकरी वर्ग सुध्दा याच मार्गाने नेहमी रहदारी करीत होते. मात्र वर्षभरापासून या मार्गावरील पुल खचलेला असताना सुध्दा पाटबंधारे विभाग त्याकडे दुर्लक्ष करित आहे .खचलेल्या पुलाकडे पाटबंधारे विभागाने लक्ष न दिल्यास या मार्गावर केव्हाही अनुचीत घटना घडू शकते .याला पाटबंधारे विभागाचे अधिकारी च जबाबदार राहणार असे नागरिकांचे वतीने लोकमत प्रतिनिधी जवळ गावकरी लोकांनी मत व्यक्त केले आहे .
सोनापूर गावालगत असलेल्या घोडाझरी कालव्यावरील नेहमी रहदारी असलेला पुल खचून गेला आहे. संबंधित पुलाची दुरूस्ती करण्यासाठी खासदार अशोक नेते यांनी घटनास्थळाला भेट देऊन संबंधित पाठबंधारे विभागाच्या अधिकारी वर्गानी लक्ष देऊन दुरूस्ती करावे .असे निर्देश दिले असताना सुध्दा पाठबंधारे विभाग त्या कडे दुर्लक्ष करीत असल्याने खचलेल्या पुलामुळे नागरिकांचे जीव धोक्याचे आहे.
होमदेव मेश्राम
माजी भाजपा तालुका अध्यक्ष नागभीड.

