प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - ग्रामीण भागातील नागरिक गरीब ,निराधार लहान मुलांच्या आवडीनुसार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळत नाही व साहित्य फार महत्वाचे व गरजेचे असते ही जाणीव लक्षात घेऊन भेजगाव ग्राम पंचायतीचे सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अखिल गँगरेड्डीवर यांनी भरजगाव, येथील आंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना, दहेगाव, मानकापुर येथे १४ वित आयोगातुन बॅग, ड्रेस, बेल्ट,बूट अशा शैक्षणिक साहित्याचे वाटप सरपंच अखिल गांगरेड्डीवार यांनीं आपल्या ग्राम पंचायत मधील सर्व सदश्यांना विश्वासात घेऊन साहित्य वाटप केले याप्रसंगी विवेकानंद उराडे,मुकेश ठाकूर ,जलित मोहुले,रमेश वेलके,चेतना कुळमेथे,ग्राम विकास अधिकारी मंगर, कर्मचारी अमोल वाढई ,प्रविन चटारे ,अंगनवाडी सेविका वैशाली गांगरेड्डीवार, निमा शेन्डे,शितल वाढई ,मालता वाढई, निकुरे आणि अनेक लहान मुले उपस्थित होते. लहान मुलांना ड्रेस, बॅग,बूट, बेल्ट असे साहित्य मिळाल्याने चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
