अनिकेत अगडे/नागभीड
तळोधी बाः चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठविण्याचे शासननिर्णय झालेला असताना सुध्दा अवैध दारु तस्कराकडून मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात दारुची तस्करी होत असताना तळोधी बा.पोलीसांना सायंकाळच्या दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे नाकाबंदी करुन डस्टर गाडीत असलेल्या १४ पेटया संत्रा देशी दारु जप्त करुन आरोपी संगतसिंग परवासिंग बावरी वय २० रा.इंदिरानगर चंन्दपूर याला अटक करण्यात आली.वरील कारवाई पोलिस अधिक्षक साळवे साहेब यांच्या मार्गदर्शन खाली तळोधी बा.पोलिस स्टेशन चे ठाणेदार रविंद्र खैरकर ,पोलिस हवालदार निलकंठ भोयर ,मुळेवार ,हंसराज सिडाम,पोलिस शिपाई शिंन्दे यावेळी उपस्थित होते.
