चंद्रपूर - जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून राज्य रक्त संक्रमण परिषद, महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग मुंबई व रक्तकेंद्र सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर आयोजक संस्था व रक्तदाते यांचा सत्कार समारंभ चे आयोजन दिनांक 18 जून 2021 रोजी चंद्रपूर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे केले होते. ज्यांनी कोरोना काळात रक्तदान शिबिराचे आयोजन यशस्वीरित्या केले व सामाजिक दायित्व जपले, त्या सर्व संस्थांचा व रक्तदात्यांचा भव्य असा सत्कार समारंभ करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित मा. ना. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार मंत्री महाराष्ट्र शासन, तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर चे आमदार मा. किशोरभाऊ जोरगेवार जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती. संध्याताई गुरनुले, जिल्हाधिकारी मा. श्री. अजय गुल्हाने, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर चे अधिष्ठाता डॉ. अविनाश टेकाडे डॉ सोनकुसरे, जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय चंद्रपूर चे डॉ. निवृत्ती राठोड, रक्तसंक्रमण अधिकारी सामान्य रुग्णालय चंद्रपूर डॉ. अनंत हजारे हे सर्व मान्यवर उपस्थित होते.
कोरोना काळात रक्तदान शिबीर आयोजन व आजपर्यंत 25 पेक्ष्या जास्त वेळा रक्तदान केल्याबदल मान्यवरांच्या हस्ते रक्तदाते, नाट्यकलावंत, कवी, सामाजिक कार्य करण्यासाठी धडपड करणारे युवा श्री अतुल मारोती येरगुडे यांचा सत्कार करण्यात आला. अतुल येरगुडे यांनी सत्काराचे श्रेय प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे हातभार लावणारे मित्रमंडळी, रक्तदान महादान फाउंडेशन, तसेच शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळ सिदूर यांना दिले व जिल्हा सामान्य रुग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महा. व रक्तकेंद्र सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांचे विशेष आभार मानले.