Tiger attack
ब्रह्मपुरी - तालुक्यातील हरणी गावात जंगलानजीक असलेल्या शेतात गेलेल्या 60 वर्षीय शामराव डोमाजी ननावरे यांच्यावर वाघाने हल्ला करीत ठार केले.
26 जून ला तळोधी वनक्षेत्रातील जंगल जवळ ननावरे यांची शेती होती नेहमीसारखे ते सायंकाळी 7 च्या सुमारास शेतात गेले होते.
मात्र त्या परिसरात वाघ दबा धरून होता, अचानक वाघाने ननावरे यांचेवर हल्ला चढविला या हल्ल्यात ननावरे यांचा मृत्यू झाला.
ननावरे घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी शोध घेतला मात्र शेताजवळ ननावरे यांचा मृतदेह आढळला.
चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत वन्यप्राणी-मानव संघर्षात एकूण 23 नागरिकांनी आपला जीव गमावला आहे.
