चंद्रपूर - व्रताद्वारे माणुसकीची जपवणूक करता येते याचं उत्कृष्ठ उदाहरण चंद्रपूर शहरातील माणिनी बहुद्देशीय महिला मंडळाने दिलं आहे.
वटपौर्णिमा निमित्ताने विवाहित महिला आपल्या पतीच्या उदंड आयुष्यासाठी उपवास ठेवते.
माणिनी महिला मंडळाच्या वतीने तुकूम प्रभाग क्रमांक 1 मध्ये हनुमान मंदिर परिसर व दत्तनगर या ठिकाणी आगळावेगळा उपक्रम मंडळाने राबविला.
माणिनी मंडळाच्या अध्यक्षा सौ. चैताली नवले यांनी सुवासिनींना कल्पना दिली की कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेले, अनेक नागरिक आजही उपाशी झोपत आहे, त्यांना आपल्या व्रताच्या माध्यमातून ओटीतील शिल्लक राहिलेले धान्य वाटप करावे असे सुचविले.
नवले यांची ही कल्पना सर्व सुवासिनींना आवडली व वटपौर्णिमेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 1 मध्ये छोटेखानी कार्यक्रम घेत गरजवंतांना धान्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमात प्रभाग क्रमांक 1 मधील नगरसेविका शिलाताई चव्हाण, भारती उपाध्ये, स्वाती गोरडवार, मनीषा सरूरकर, सपना मेश्राम, कोसे काकू, सिंधू ताई चौधरी, सविता पोळे यांनी सहभाग घेतला.
