चंद्रपूर - जिल्ह्यात शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या नेतृत्वात संघटन जोरात वाढत असून आता शिवसेना प्रणित युवासेनेत अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या निर्देशाने युवासेना युवतींची नेमणूक करण्यात येणार आहे.
चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा विधानसभा क्षेत्रासाठी युवासेनेत कार्य करू इच्छिणाऱ्या युवतींनी रविवारी विश्रामगृह, चंद्रपूर येथे उपस्थित रहावे असे आवाहन युवासेना जिल्हाप्रमुख निलेश बेलखेडे व जिल्हा समनव्यक विक्रांत सहारे यांनी केले आहे.
युवासेनेत कार्य करणाऱ्या युवतीच्या मुलाखती रविवारी 27 जूनला युवासेना कार्यकारणी सदस्य रुपेश कदम, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य शीतल देवरुखकर-शेठ व युवासेना सहसचिव अश्विनी पवार ह्या घेणार आहे.
मुलाखतीला येताना युवतींनी सोबत आपले छायाचित्र आणावे असे आवाहन युवासेना जिल्हा कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
