चंद्रपूर - महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कडून संपूर्ण राज्यभर 'मदतीचा एक घास' हा उपक्रम कोरोना काळातील गरजूंना मदत करण्यासाठी सुरू आहे. चंद्रपुरात देखील हा उपक्रम मागच्या १७ दिवसापासून महिला काँग्रेस कडून सुरू आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात हा उपक्रम सुरू असून दररोज दुपारी १२ वाजता गरजूंना जेवण देण्यात येते. या उपक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून, आता सामान्य नागरिक सुद्धा या उपक्रमात हातभार लावायला पुढे सरसावले आहेत. शहरातील प्रतिष्ठित नागरीक मतीन कुरेशी यांनी आज 'मदतीचा एक घास' या उपक्रमात आपला सहभाग नोंदवला, त्यांनी आपल्या कडून ४०० थाली आणि पाणी बॉटल गरजूं साठी आणले होते. हे जेवण शहर काँग्रेस चे अध्यक्ष रामू तिवारी यांच्या हस्ते तसेच तिथे उपस्थित महिला पदाधिकारी यांच्या हस्ते गरजूंना वितरित करण्यात आले. मतीन कुरेशी यांनी जो पुढाकार गरजूं साठी घेतला त्याचे सर्वत्र कैतुक होत आहे. यावेळी महिला काँग्रेस च्या प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर, जिल्हा उपाध्यक्षा सुनीता धोटे, शहर उपाध्यक्षा स्वाती त्रिवेदी, ब्लॉक अध्यक्ष शीतल काटकर, शहर सचिव वाणी डारला, सदस्य लता बारापत्रे, राजेश सिंग चौहान एजाज कुरेशी, हाजी अली, प्रज्ञा नवले उपस्थित होते.