चंद्रपूर - शहरातील पॉश एरिया म्हणजे सिव्हिल लाईन, उच्चभ्रू नागरिक वास्तव्यास असलेल्या परिसरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे.
26 मे ला साईबाबा वार्ड, सिव्हिल लाईन परिसरातील 48 वर्षीय रामू शेट्टी यांच्या मालकीची होंडा ऍक्टिव्हा दुचाकी वाहन क्रमांक एमएच 34 बीजे 2737 किंमत 20 हजार चोरी झाली असल्याची तक्रार रामनगर पोलीस स्टेशनला नोंदविली.
सदर दुचाकी शेट्टी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वसाहती समोर ठेवली होती मात्र सकाळी 5 वाजता ती दुचाकी जागेवर नसल्याने चोरी गेली असल्याची तक्रार शेट्टी यांनी नोंदविली.
रामनगर पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाचा तपास केला असता खबरीमार्फत दुचाकी चोरट्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी 24 वर्षीय अतुल विकास राणा या आरोपीला शामनगर, भगतसिंग चौकातून अटक केली.
सदर गुन्ह्यातील रामू शेट्टी यांची दुचाकी पोलिसांनी आरोपी अतुल कडून जप्त केली, व दुचाकी चोरी प्रकरणात कसून चौकशी केल्यावर आरोपी कडून अजून एक दुचाकी वाहन क्रमांक एमएच 34 एआर 8310 जप्त करण्यात आली.
पोलिसांनी आरोपिकडून 2 दुचाकी जप्त केल्या.
सदरची यशस्वीपूर्ण कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस उपविभागीय अधिकारी शिलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक यादव, सपोनि एकरे, मलिक, रजनीकांत पूट्टावार, प्रशांत शेंदरे, संजय चौधरी, पुरुषोत्तम चिकाटे आदींनी पार पाडली.
