गडचांदूर/सै.मूम्ताज़ अली:-
महात्मा गांधी विद्यालयाचे शिक्षक "विठ्ठलराव कुमरे" व "विनोद एकनाथ एकरे" हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल ३१ मे रोजी गडचांदूर शिक्षक प्रसारक मंडळाच्या सभागृहात आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात या दोन्ही शिक्षकांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे होते.यावेळी संचालक विकास भोजेकर, मुख्याध्यापक कृष्णा बत्तूलवार, मुख्याध्यापक शरद जोगी, पर्यवेक्षिका श्रीमती शोभा घोडे इतरांची प्रामुख्याने उपस्थिती होती. मनोहर बु-हाण यांनी सेवानिवृत्त शिक्षकांच्या कार्याची प्रशंसा केली.उपस्थित मान्यवरांनी सुद्धा यांच्या कार्याची प्रशंसा केली.सत्काराला उत्तर देताना या दोन्ही शिक्षकांनी संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.दोघांनाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा उपस्थितांनी दिल्या.सदर कार्यक्रमाचे संचालन शोभा घोडे तर आभार किरण पोगुलवार यांनी मानले.