प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल- ओबीसी प्रवर्गाचे राजकीय क्षेत्रातील आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकिय आरक्षणाचा ओबीसींचा टक्का कमी झाला आहे.यावर शासनाने त्वरित कार्यवाही करून ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करावे अशी मागणी माळी महासंघाच्या चिंतन बैठकीत करण्यात आली.ऑनलाइन झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे हे होते.
राष्ट्रीय महासचिव रवींद्र अंबाडकर, प्रदेशाध्यक्ष अरुणराव तिखे,राष्ट्रीय कोषाध्यक्ष प्रा.नानासाहेब कांडलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.महाराष्ट्रात ओबीसी प्रवर्गात माळी समाजाची संख्या ही सर्वाधिक आहे.त्यामुळे ओबीसी प्रवर्गाचे राजकीय आरक्षण कमी होण्याचा सर्वात मोठा फटका माळी समाजाला बसण्याची शक्यता असल्याची चिंता या बैठकीत व्यक्त करण्यात आली. या पृष्ठभूमीवर अविनाश ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली माळी महासंघासह माळी समाजाच्या इतर संघटनांच्या एका शिष्टमंडळाने माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना.देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून याबाबत चर्चा केली आणि या संदर्भातील एक निवेदन त्यांना दिले.हा विषय योग्य असल्याचे मान्य करीत राज्य शासनाशी यावर चर्चा करण्यात येईल असे आश्वासन ना.देवेंद्र फडणीस यांनी शिष्टमंडळाला दिले.
मुख्यमंत्र्यांना सुद्धा याबाबतचे निवेदन देण्यात येणार असल्याचेही ठरविण्यात आले. जिल्हाधिकारी,उपविभागीय महसूल अधिकारी व तहसीलदार यांच्या माध्यमातून या निवेदनाच्या प्रती मा.मुख्यमंत्र्यांना माळी महासंघाचे पदाधिकारी देणार आहेत. तसेच शनिवार २६ जून रोजी तिथीप्रमाणे छत्रपती शाहू महाराजांची जयंती असून त्या दिवशी महापुरुषांच्या पुतळ्यासमोर "थाळी बजाओ" आंदोलन करून शासनाचे लक्ष ओबीसी राजकीय आरक्षण प्रश्नावर वेधण्यात येणार आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यात आमदार,खासदार, मंत्री व पालकमंत्री यांना निवेदन देवून या प्रश्नावर त्यांची भूमिका जाणून घेण्यात येईल आणि त्यांच्या घरासमोर या प्रश्नावर आक्रोश आंदोलन करण्यात येणार असल्याचे या बैठकीत ठरविण्यात आले आहे.
या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी ओबीसींचे वाढीव राजकीय आरक्षण रद्द का झाले याबाबतची माहिती दिली.भविष्यात शासनाने कोणती भूमिका घ्यावी याबाबतचे मार्गदर्शन सुध्दा त्यांनी केले.
या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे,सचिव रवींद्र अंबाडकर, प्रदेशाध्यक्ष अरुणराव तिखे,कोषाध्यक्ष प्रा.नानासाहेब कांडलकर यांचेसह विभागीय अध्यक्ष राजेश जावरकर,हिरामण भुजबळ,संतोष जगदाळे,काळूराम गायकवाड, अतुल क्षीरसागर, दीपक जगताप,चंद्रशेखर दरवडे, एन.आय.काळे, प्राचार्य डॉ.नामदेवराव कोकोडे, डॉ.संजय घाटे, नागपूर विभागीय अध्यक्ष चंद्रकांत बोरकर, डॉ.श्रीकृष्ण गोरडे,मुंबई विभागीय अध्यक्ष दिनेश टाकरखेडे,जिल्हाध्यक्ष गोपाळराव तायडे, विलास वानखेडे,संतोष रासवे,संजय राऊत, बाळकृष्ण येनकर,गोविंद आल्हाट,मुकुंदराव पोटदुखे,लोकेश लामखेडे,विजय काळे,गजेंद्र महाजन,विजय चहारे, माजी कुलसचिव प्रा.डाँ.ईश्वर मोहुरले यांची उपस्थिती होती.