प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर - चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी हटल्यावर दारू परवाना नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे, ज्याठिकाणी दारू दुकाने आधी सुरू होते त्याच ठिकाणी दारू दुकाने सुरू होणार अशी अट राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिसूचनेत आहे.मात्र हा नियम दारू परवाना धारकांला त्रासदायक ठरत आहे, जिल्ह्यात अनेक ठिकाणी दारू दुकान गावाबाहेर सुरू करावे अशी मागणी नागरिक करीत आहे.
बल्लारपूर शहरातील रेल्वे यार्ड वार्डातील देशी दारू दुकान व बिअर बार जुन्या जागेत सुरू करण्यास नागरिकांचा विरोध सुरू झाला असून ते दुकान गावाबाहेर नेण्यात यावे असे निवेदन तहसीलदार व जिल्हा पोलिस अधीक्षकांना नागरिकांनी दिले.
रेल्वे वार्डात याआधी त्या दारू दुकानामुळे दारुडे महिलांना व वार्डातील नागरिकांना प्रचंड त्रास देत होते आता 7 वर्षांनी तेच चित्र पुन्हा दिसणार यासाठी वार्डातील नागरिकांनी प्रशासनाला ते दुकाने बाहेर हलवावी यासाठी निवेदन दिले आहे.
यामुळे दारू दुकान मालकांसमोर नवा पेच उभा राहणार आहे.