News34
चंद्रपूर - राष्ट्रवादी कांग्रेसचे नगरसेवक दीपक जयस्वाल यांनी उपमहापौर राहुल पावडे यांचेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासंबंधी पत्र आयुक्तांना दिल्याने पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली.राहुल पावडे यांनी दलित वस्ती निधीमध्ये अफरातफर केल्याचा आरोप जयस्वाल यांनी लावला आहे.
आता बहुजन समाज पक्षाच्या जिल्हाध्यक्षाच्या लेटर बॉम्ब ने पुन्हा पालिका वर्तुळात खळबळ माजवली आहे.
पालिकेचे शहर अभियंता महेश बाराई हे आपला मनमानी कारभार चालवीत असून आपल्या मर्जीतल्या कंत्राटदाराला कामे देत असतात, चंद्रपुरात काही वार्डातच विकासकामे दिसत आहे इतकंच नव्हे तर त्यांनी दलित वस्ती निधी वितरण प्रक्रियेत भेदभाव केला असल्याचा आरोप बसपा चे जिल्हाध्यक्ष मुकद्दर मेश्राम यांनी केला आहे.
बसपा नगरसेवक यांनी आंबेडकर प्रभाग क्रमांक 17 मध्ये नाली, रोड व स्ट्रीट लाईट बद्दल बाराई यांना फाईल दिली असता त्यांनी ती फेकून दिली त्यामुळे प्रभागातील विकासाची कामे ठप्प पडली आहे.
बाराई हे उर्मटपणाने वागत असल्याचा आरोप रामटेके व मेश्राम यांनी केला आहे, त्यांच्या संपूर्ण केलेल्या कामावर चौकशी लावण्याची विनंती अनिल रामटेके व मेश्राम यांनी केली आहे.