चंद्रपूर - जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी समाजाने भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा उभारला होता मात्र काही कारणास्तव आदिवासी समाजाला कसलीही पूर्वसूचना न देता तो पुतळा हटविण्यात आला.
या प्रकारावरून आदिवासी समाज आक्रमक झाला व पुतळा सन्मानाने त्या ठिकाणी उभारा अशी मागणी करू लागला मात्र प्रशासनाने आदिवासी समाजाला कागदपत्रांची पूर्तता न केल्याने सदर कारवाई केली असल्याचे समजते.
प्रशासनाविरोधात आदिवासी समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह सुरू केला सतत 124 दिवस हा सत्याग्रह सुरू होता, प्रशासनातर्फे सत्याग्रह आंदोलनाची दखल होत नसताना आदिवासी समाजातर्फे आमरण उपोषण सुरू करण्यात आले.
मागील 7 दिवसांपासून आमरण उपोषण आंदोलन सुरू आहे, मात्र प्रशासनाने अजूनही या आंदोलनाची दखल घेतली नाही. अखेर प्रा. तुमराम यांनी प्रशासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
25 जून प्रयत्न भगवान बिरसा मुंडा पुतळ्याच्या जागेचे हस्तांतरण कागदपत्रे आम्हाला द्या अन्यथाया 26 जूनपासून प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.