वरोरा - तालुक्यातील शेगाव बु. येथे घरी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड मारत तब्बल 17 जुगार बहाद्दरांना अटक करीत 7 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
मंगळवारी शेगाव निवासी गजानन शेंडे यांच्या घरी जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक सुधीर बोरकुटे यांना मिळाली.
माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत शेंडे यांच्या घरी धाड टाकली असता आरोपी गजानन शेंडे, अविनाश देवतळे, अशोक लाडे, अनिल भगत, अमोल भगत, कोरा निवासी जगदसिंह अकाली, जगतपालसिंह अकाली, मंगेश गुडदे, सचिन लोखते, विक्की पखाले, सचिन धारणे, बिजोनि निवासी दिवाकर कापसे, मोहित मुन, भेंडाळा निवासी अविनाश देवतळे, प्रवीण ठाकरे, अमीर अली मोहसीन अली, आणि सोमा कुचनकर यांना अटक करण्यात आली.
छापेमारी दरम्यान 3 लाख 18 हजार 750 रोख रक्कम, 1 लाख 41 हजारांचे 14 मोबाईल, 2 लाख 60 हजारांच्या 5 दुचाकीवाहन व 52 पत्ते असा एकूण 7 लाख 20 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
अटक करण्यात आलेल्या आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायद्यानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधीर बोरकुटे, पोउपनी जाधव, सरोदे व पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.