चंद्रपूर - अवैध दारू तस्करीनंतर जिल्ह्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा व्यापार मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
वर्ष 2012 पासून प्रतिबंधित असलेल्या या सुगंधित तंबाखूमुळे अनेक युवक कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजाराच्या जवळ गेले, यामध्ये अनेकांनी आपला जीव सुद्धा गमाविला.
चंद्रपूर जिल्ह्यात आजही बाहेर राज्यातून मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू येत आहे मात्र अन्न व औषध प्रशासन विभाग कारवाई करण्याचे टाळत आहे, सुगंधित तंबाखूच्या वाहतुकीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करावी अन्यथा भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टी तर्फे आंदोलन करण्यात येणार असा इशारा पक्षाचे विदर्भ सचिव संजय अनेजा यांनी दिला आहे.
शहरात आज खर्रयाच्या नावाने सुगंधित तंबाखू मुख्य मार्गावर विक्री केला जात आहे. हे प्रशासनाला दिसत नाही आहे का? की जाणून बुजून अन्न व औषध प्रशासन विभाग डोळेझाक करीत आहे.
हा जीवघेणा व्यापार थांबवावा अशी मागणी भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पक्षाचे विदर्भ सचिव संजय अनेजा यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला केली आहे. जर मागणीची दखल झाली नाही तर 1 महिन्याच्या आत पक्षातर्फे आंदोलन करण्यात येणार व त्याची संपूर्ण जबाबदारी अन्न व औषध प्रशासन विभागाची राहणार आहे.
निवेदन देतेवेळी राष्ट्रीय सचिव सुरेश ठाकूर, महिला शहर अध्यक्ष रंजिता पेटकर व इलियास शेख उपस्थित होते.