बल्लारपूर/रमेश निषाद
कोठारी - चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपीपरी येथील पाचगाव ला मागील 6 महिन्यापासून पुलाचे काम सुरू आहे.
गावातील नागरिकांना येजा करण्यासाठी तात्पुरते पाईप टाकून मार्ग बनविण्यात आला होता मात्र शनिवारी आलेल्या पावसात तो तात्पुरता मार्ग पाण्यात वाहून गेला.
त्यामुळे कोठारी, परसोडी, पाचगाव, तोहोगाव, आर्वी, वेजगाव, लाठी गावात जाण्यासाठी ग्रामीण नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.
लहान पूल वाहून गेल्याने 15 गावातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने मोठा पूल जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तरी लहान पूल तयार करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

