चंद्रपूर - आष्टी येथील वैनगंगा नदीच्या पुलाखाली ट्रक पलटी झाल्याने वाहन चालक व क्लिनर जागीच ठार झाला, ही घटना 13 जूनच्या मध्यरात्री तब्बल 2.15 मिनिटांनी घडली, या सर्व घटनेचा थरार बल्लारपूर येथे येणाऱ्या त्या ट्रक मधील प्रवाशाने कथन केला.
30 वर्षीय अजय कारपेनवार रा. बल्लारपूर हा आलापल्ली येथे कामानिमित्त गेला होता काम आटोपल्यावर बल्लारपूर कडे येण्यासाठी आलापल्ली येथील फॉरेस्ट डेपोसमोर उभा होता, त्याचवेळी Mh 34 bg6111 हा ट्रक ला लिफ्ट मागितली, त्यानंतर सदर ट्रक वाहन चालक 32 वर्षीय नितीन बिके व क्लिनर कालू सलूजा दोघेही राहणार किसाननगर सावली असे त्यांनी सांगितले.
ट्रक मध्ये तेंदूपत्ता ओवरलोड असल्याने वाहनचालक ट्रक ला नियंत्रित करू शकत नसल्याने त्याने तो ट्रक हळूहळू पुढे नेत होता.
काही क्षणात ट्रक वैनगंगा नदीच्या पुलावर पोहचला असता वाहनचालकांने तो ट्रक नदी पात्राच्या उजव्या बाजूस पलटी केला.
ट्रक पलटी झाल्याने वाहनचालक व क्लिनर जागीच ठार झाले, मात्र प्रवाशी अजय कारपेनवार हा किरकोळ जखमी झाला.
सकाळ होताच अजय ने याबाबत नागरिकांना मदत मागून पोलिसांशी संपर्क साधला.
पोलिसांनी घटनेचा पंचनामा करीत दोघांचे मृतदेह बाहेर काढत शवविच्छेदन साठी पाठविले.
