प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर - शहरातील कायदा व सुव्यस्था अबाधित नियंत्रित करून कोरोना काळात नागरिकांना नेहमी जागृत केल्याबद्दल बल्लारपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचा भाजप कामगार आघाडीतर्फे सत्कार करण्यात आला.
भाजप कामगार आघाडीचे प्रदेश महासचिव अजय दुबे यांनी बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांची भेट घेत शाल श्रीफळ देत सन्मान केला.
पोलीस निरीक्षक पाटील यांनी यावेळी सांगितले की कोरोना काळातील कार्य व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे हे आमचं कर्तव्य आहे.
कोरोना काळात उत्कृष्ठ कार्य व शहरातील गुन्हेगारीला आळा घातल्याबद्दल पाटील यांचा यावेळी सत्कार करण्यात आला असल्याचे अजय दुबे यांनी यावेळी सांगितले.
लोकलेखा समिती अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेल्या सत्कार कार्यक्रमात भाजप ट्रान्सपोर्ट सेलचे तालुकाध्यक्ष गुलशन शर्मा, भाजयुमोचे उपाध्यक्ष मिथिलेश पांडे, कामगार नेते कैलास गुप्ता, भाजयुमो विद्यार्थी आघाडी महामंत्री प्रतीक बारसागडे, कामगार नेते मनीष रामील्ला, युवा नेते श्रीकांत उपाध्याय, कृष्णदत्त गुप्ता, श्रवणकुमार आदी उपस्थित होते.
