प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर - लॉकडाउन मुळे अनेकांची रोजगार गेली, हातावर पोट असणाऱ्यांवर उपासमारी ची वेळ आली, म्हणूनच बल्लारपुरातील महिलांची संस्था "रणरागिनी हीरकणी फाउंडेशन " तर्फे गरीबांसाठी १० रुपयात उत्तम भोजन ची व्यवस्था करण्यात आली आहे , बल्लारपुरातील महिलांच्या या पुढाकारने सेकड़ो गरिबांच्या पोटाला आधारझाला आहे , कोरोना मुळे निर्माण झालेली परिस्थितिने गौर गरीबांवर उपासमारीचि वेळ आली होती , मात्र आता महिलानी सुरु केलेला है उपक्रम गरीबांसाठी वरदान ठरणार आहे.
सोमवारी मिक्सवेज करी आणि राइस, मंगलवारी राजमा करि राइस, बुधवारी बरबटी करी आणि राइस, गुरवारी कालाचना आणि जीरा राइस , शुक्रवारी नुट्रिला करी आणि राइस , शनिवारी मोठ आणि राइस तर रविवारी काबुली चना आणि जीरा राइस असा चवदार मेनू असणार आहे.
आज बल्लारपुरातील नगर पालिकेच्या बचत भवन येथे या उपक्रमाची सुरवात करण्यात आली, या कार्यक्रमात सर्व धर्म समभाव ची भावना ठेवत सर्व धर्माचे व्यक्तींना अतिथि म्हणुन बोलविण्यात आले , या वेळेस हिन्दू , मुस्लिम , सिख , ईसाई , भंतेजी मंचा वर उपस्थित होते व सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले , तसेच या कार्यक्रमात बल्लारपुरातील प्रसिद्ध डॉक्टर नितिन कल्लूवार प्रमुख अतिथि म्हणुन मंचावर उपस्थित होते।
बल्लारपुरातील "रणरागिनी हीरकणी फाउंडेशन " ची अध्यक्ष्या डॉ मंजूषा कल्लूवार सह संस्थेचे सर्व सदस्य या वेळी उपस्थित होते, संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांची ही कामगिरी गरीबांसाठी फार मोलाची ठरणार आहे , हेच नाही तर या संस्थे तर्फे कोरोना च्या पहिल्या लाटे पासून शेकड़ो गरजू कोरोना रुग्णांना ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध करुण अनेकांना जीवनदान देऊन समाजा पुढे एक आदर्श निर्माण केला आहे , तसेच जे कोरोना रुग्ण होम आइसोलेशन मध्ये होते त्यांना मोफत जेवन पुरविण्याचे काम सुद्धा या महिलांच्या संस्थेतर्फे करण्यात आले होते.