प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - चंद्रपूर-गडचिरोली मुख्य हायवे महामार्ग मुल नगराच्या मध्यभागातून गेला असून याच मार्गावर डाव्या बाजूला ढिवर मोहला लागून आहे.व याच वार्डातील नागरिकांना अत्यावश्यक लागणारे पिण्याचे व घरगुती पाणी भरण्यासाठी न.प. ची सार्वजनिक बोरव्हेल आहे आणि बोरव्हेलच्या समोरच श्री.बुक्कावार यांचे देशी दारूचे दुकान आहे. त्यामुळे या दारूच्या दुकानावर दारु पिणाऱ्यांची सकाळ पासून तर रात्री दुकान बंद होईपर्यंत सारखी वर्दळ असते. त्यामुळे बोरव्हेलचे पाणी भरण्यास महिलांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. करिता श्री. बुक्कावार यांचे दारूचे दुकान सुरु करण्यास कसलीही परवानगी देऊ नये अशी मागणी वार्डातील महिलांनी केली आहे. हे दारूचे दुकान सुरु झाले तर दारु पिणाऱ्यांच्या अश्लील घाणेरड्या शिव्या ऐकणे महिलांसाठी कठीण होते. तसेच बोरव्हेलचे पाणीही भरणे होणार नाही. आणि मुख्य हायवे रोड पासून दारूचे दुकान सुरू करण्यास १०० मीटर पेक्षा जास्त अंतर असायला पाहिजे परंतु श्री. बुक्कावार यांचे दुकान मुख्य हायवे पासून १०० मीटरच्या आतच आहे. आणि नियम बाह्य आहे. करिता श्री. बुक्कावार यांचे दारूचे दुकान सुरु करण्यास जिल्हा पोलिस प्रशासनाने परवानगी देऊ नये. अशी मागणी वार्डातील महिलांनी केली आहे.
आज पर्यंत त्याच परिसरात अवैध दारू विक्री सुरू होती तेव्हा कोणीच काही बोलले नाही
उत्तर द्याहटवा