चंद्रपूर - तब्बल 6 वर्षांनी चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी उठल्यावर दारूविक्री परवाना नूतनीकरन प्रक्रियेला आज पासून सुरुवात झाली आहे.
चंद्रपूर, राजुरा व वरोरा येथे दारूविक्री परवाना नूतनीकरण प्रक्रिया सुरू असून त्या भागातील दारूविक्री परवाना धारकांनी आपले नूतनीकरण प्रक्रियेत सहभाग घेतला असून राज्य उत्पादन शुल्क विभागात सर्व अर्जाची छाननी करणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे चंद्रपूर अधीक्षक सागर भोमकर यांनी दिली आहे.
उत्पादन शुल्क कार्यालयात एक खिडकी अंतर्गत परवाना नूतनीकरण व नव्या परवान्यासाठी अर्ज स्वीकारले जात आहे.
शहरातील दारूविक्री बार व वाइन शॉप मध्ये दुरुस्ती चे काम सुरू आहे.
पुढील आठवड्यात जिल्ह्यात सर्व दारू दुकाने सुरू होणार असल्याची माहिती आहे.