गडचांदूर/सै.मूम्ताज़ अली:-
गडचांदूर नगरपरिषद अंतर्गत अंदाजे ४ कोटींचे ओपन स्पेसच्या संरक्षण भींत व सौंदर्यीकरण कामांचे कार्यादेश देण्यात आले. लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती असून विकासाच्या दृष्टीने सदर कामांना महत्व प्राप्त झाल्याचे चित्र आहे.असे असताना सदर कामांची देखरेख व एमबी बनविणे सिव्हिल इंजिनियर मार्फत होणे अपेक्षित आहे.मात्र याठिकाणी अजब प्रकार पूढे आला आहे.येथील नगरपरिषदेतील आरोग्य विभाग प्रमुख स्वप्निल पिदूरकर हे मेकॅनिक इंजिनीअर असताना यांच्याकडे सिव्हिल कामांची जबाबदारी सोपविण्यात आली.सदर कामाची देखरेख व एमबी बनविण्याचे काम सिव्हिल इंजिनिअर मार्फत करण्यात यावे अशी मागणी नगरपरिषदेतील विरोधी नगरसेवक रामसेवक मोरे व अरविंद डोहे यांनी न.प. मुख्याधिकाऱ्याकडे निवेदनातून केली आहे.
सदर कामे ही १४ वित्त आयोग फंडातून व आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.पिदूरकर हे आरोग्य विभाग प्रमुख असून ते मेकॅनिकल इंजिनीअर आहे.यांना सिव्हिल कामांचा कुठलाही अनुभव नाही.विशेष म्हणजे न.प.मध्ये सिव्हील इंजिनीअर उपलब्ध असताना आणि सिव्हिल इंजिनीअरकडे फारशी कामे नसताना यांच्याकडे ही कामे न सोपवता पिदूरकर यांनी सदर कामे स्वतःकडे ठेवण्याचे कारण काय? हा मात्र संशोधनाचा विषय ठरत आहे.विशेष म्हणजे पिदूरकर यांना सदरच्या कामाबद्दल काहिही माहिती नाही.
पिदूरकरकडे सदर कामाची देखरेख व एमबीचे काम ठेवल्यास कामाचा दर्जा व एमबी योग्य होऊ शकत नाही असे मत व्यक्त करण्यात आले असून न.प.ची फार मोठे नुकसान होण्याची शक्यता संबंधितांनी निवेदनातून व्यक्त केली आहे.यापूर्वी सदर कामाचे अंदाजपत्रक तयार करताना बऱ्याच चुका झाल्या.त्या चुका आपल्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तो अंदाजपत्रक दुरूस्त करण्यात आल्या होत्या.अजुनही काही चुका असल्याची शक्यता नाकारता येत नसून त्यावेळेस जर सिव्हिल इंजिनीअरकडून अंदाजपत्रक तयार केला असता तर चुकाच झाल्या नसत्या व जवळपास एक वर्षाचा विलंब लागला नसता.असे असताना परत त्याच व्यक्तीकडे सदरची कामे ठेवल्यास न.प.ची मोठी हानी व विकासात अडथळा निर्माण होण्याची शंका व्यक्त करत सदरची कामे पिदूरकर यांच्याकडून काढून रितसरपणे न.प.च्या सिव्हिल इंजिनीअरकडे सोपवावी अशी मागणी वजा विनंती नगरसेवक रामसेवक मोरे व अरविंद डोहे यांनी निवेदनातून केली आहे.जिल्हाधिकारी चंद्रपूर,जिल्हा प्रशासन अधिकारी (न.प.विभाग) चंद्रपूर,नगराध्यक्षा गडचांदूर यांनाही निवेदनातून माहिती देण्यात आली असून आता याविषयी काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मेकॅनिकल इंजिनिअर काम करतो आहे सिव्हील इंजिनिअरचे! कंपाऊंडर डॉक्टर होने म्हणजे नीम हकीम खतरेमें जान.अशी परिस्थिती गडचांदूर नगर परिषदेची झाली आहे असेच म्हणावे लागेल.
उत्तर द्याहटवा