चंद्रपूर - जगात आलेल्या कोरोनाच्या सुनामीने नागरिकांच आयुष्य बदलून गेले, आज नागरिक जिवंत राहण्यासाठी धडपड करीत आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अत्यंत धोकादायक आहे, लाखो नागरिकांनी यामध्ये आपला जीव गमावला.
केंद्र व राज्य सरकार कोरोना रोखण्यास असमर्थ ठरले, या भीषण महामारीत सुद्धा कोरोना रुग्णांना लागणार रेमडीसीविर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू झाला.
काळाबाजार करणाऱ्या नागरिकांना नफा महत्वाचा जीव नाही असे चित्र आज देश व राज्यात दिसत आहे.
पहिली लाट 45 ते 100 वयोगटातील नागरिकांना धोकादायक तर दुसऱ्या लाटेत 18 ते 44 वयोगटासाठी धोकादायक ठरली, मात्र आता येणारी तिसरी लाट ही 0 ते 18 वयोगटातील मुलांना धोकादायक ठरणार असा अंदाज तज्ञांनी लावला आहे.
यासाठी राज्यातील अनेक भागात लहान मुलांसाठी कोविड सेंटर सुरू करण्यात येत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात मात्र ही परिस्थितीच उलट आहे, पहिली लाट नागरिकांनी जेमतेम घालवली मात्र दुसऱ्या लाटेत आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली.
आजही नागरिकांना बेड मिळविण्यासाठी धडपड करावी लागत आहे, अनेकांनी तर रुग्णालया समोर आपला जीव सोडला.
दुसऱ्या लाटेत ही परिस्थिती तर येणारी 3 री लाट कशी असेल? आज कोरोना विषाणू थांबणार कसा यावर नियोजन व्हायला हवं मात्र जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारलेल्या मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नेमकं काय नियोजन करीत आहे हे नागरिकांच्या डोक्याबाहेर आहे.
जिल्ह्यात आरोग्य व्यवस्था आज बळकट व्हायला हवी, उत्तम नियोजन हवं, लहान मुलांना तिसऱ्या लाटेपासून कस सुरक्षित ठेवायला हवं याचा विचार आताच करायला हवा मात्र पालकमंत्री वडेट्टीवार सध्या आपल्या विधानसभा क्षेत्रात विकासाचे काम करण्यात व्यस्त दिसतं आहे.
पालकमंत्री वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात तब्बल 5 कोटींचे समाज मंदिराच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता दिली आहे.
सावली, ब्रह्मपुरी व सिंदेवाही क्षेत्रात 5 कोटी 90 लक्ष रुपयांचे समाज मंदिराचे बांधकाम होणार आहे.
आज जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम आरोग्य व्यवस्थेची गरज आहे, समाज मंदिरांची नाही, नागरिकांना बेड मिळत नाही, आरोग्य कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे, ऑक्सिजन ची कमतरता असून यावर नियोजन करायचं सोडून पालकमंत्री मात्र विधानसभा क्षेत्रात विकासाची गंगा वाहत आहे.
सध्या कोरोनाचे भीषण संकट संपूर्ण राज्यात निर्माण झाले, चंद्रपूर जिल्ह्याची परिस्थिती सुद्धा गंभीर आहे, सध्या कोरोनाला हद्दपार कसे करता येईल यावर नियोजन करणे गरजेचे आहे.
