चंद्रपूर - न मागता मिळालेले प्रेम म्हणजे "आईचे", मुलांसाठी धडपडणार कर्तृत्व म्हणजे आईचं.
मात्र आज कोरोना सारख्या या भीषण काळात अनेक लहान-मोठे आईच्या प्रेमाला मुकले आहे.
सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्र उपाध्यक्ष व शहराचे केबल व्यवसायी दिलीप रिंगणे यांच्या मातोश्री 75 वर्षीय सुमन रिंगणे यांचं आज कोरोनाने निधन झालं.
काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची बाधा झाली होती, बाधा झाल्यावर रुग्णालयात बेड मिळावा यासाठी रिंगणे परिवार धडपडत होता, मात्र 2 दिवस त्यांना बेड मिळू शकला नाही.
त्यांच्या आईची तब्येत खालावत होती आणि रुग्णालयात बेड काही मिळत नव्हता.
काही राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नागरिकांनी प्रयत्न करीत जिल्हा रुग्णालयात बेड मिळवून दिला.
मात्र त्यानंतर सुमन रिंगणे यांची जगण्यासाठी धडपड सुरू झाली, उपचाराला त्या प्रतिसाद देत नव्हत्या, कोरोनाची भीषण परिस्थिती त्यांनी रुग्णालयात बघितली, मात्र त्यांचे सुपुत्र दिलीप, प्रकाश व नाती यांनी त्यांना लढण्याच बळ दिलं.
परंतु कोरोनाच्या लढ्यात ऐन मातृदिनी त्या हरल्या, 9 मे ला पहाटेच्या दिवशी त्यांचं निधन झालं.
घरातील आधारवड गेल्याने रिंगणे परिवार शोक सागरात बुडाला.
