घुग्गुस - जिल्हाबंदी असूनही आज चंद्रपूर जिल्ह्यात सर्रासपणे अवैध दारूची वाहतूक सुरूचं आहे, चंद्रपूर पोलीस ही तस्करी थांबविण्यासाठी यशस्वी ठरत तर आहे मात्र सदर कारवाई आरोपींचा थांगपत्ता लागत नाही आहे.
जिल्ह्यात विविध तालुक्यात अवैध दारू तस्करी वर पोलिसांनी कारवाई केल्या मात्र आरोपी घटनास्थळा वरून पसार झाले.
रामनगर व शहर पोलीस असो की ग्रामीण भागातील जंगलात असो की घरी दारुसाठा पोलिसांना मिळत आहे, आरोपींचे नाव पण पोलिसांना मिळते मात्र आरोपी पोलिसांच्या हाती लागत नाही.
जिल्हा दारुबंदी असताना शेजारील यवतमाळ जिल्ह्यातून आजही दारू अवैध पद्धतीने येत आहे,
वणी तालुक्यातून दारू घेऊन येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घुग्गुस येथील शास्त्री नगर क्वार्टर न 238 येथे सापळा रचून कार क्रमांक एमएच 31 सिएन 0823 ला थांबवून तपासणी केली असता त्यात अवैध देशी दारूच्या 2400 नग 90 एमएल शिशा व विदेशी दारूच्या 292 नग 180 एमएल नग आढळून आल्या, कार चालक पोलीस दिसताच वाहन सोडून फरार झाला. ही कारवाई शनिवारच्या दुपारी 2.45 वाजता दरम्यान करण्यात आली पोलिसांनी फरार आरोपी सोनू सारसर व टक्कु यादव दोन्ही रा. शास्त्रीनगर, घुग्गुस यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून देशी दारू किंमत 2 लाख 40 हजार, विदेशी दारू किंमत 80 हजार व वाहन किंमत 80 हजार असा एकूण 4 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे घुग्गुस येथील चेकपोस्ट च्या आत गाडी आल्यावर पोलिसांनी कारवाई केल्यावर आरोपी पसार कसे झाले हा सध्यातरी अनुत्तरित प्रश्न आहे.
सदरची कारवाही पोलीस निरीक्षक गांगुर्डे यांच्या मार्गदर्शना खाली एपीआय गोखरे मैडम,गुन्हे शाखेचे सपोनि. गौरीशंकर आमटे, महेंद वनकवार, मनोज धकाते,रंजित भुरसे, सचिन बोरकर व आडे यांनी केली. पुढील तपास आमटे करीत आहे.