वरोरा - वरोरा वनपरिक्षेत्रातील पळसगाव परिसरात काही दिवसांपासून वाघाचे वास्तव्य वाढले आहे. तीन दिवसांपूर्वी वन कर्मचाऱ्यास या भागात रक्त आढळून आले. वनविभागाच्या कॅमेऱ्यात वाघाच्या गळ्यात पट्टा असल्याचे दिसून आले.
मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर
त्या वाघाच्या गळ्यात पट्टा बांधला अशी चर्चा काही दिवसांपासून जिल्ह्यात चांगलीच रंगली होती, मात्र वनविभागाच्या शोध मोहिमेत या अफवेवर पूर्णविराम लागला.
वाघाच्या गळ्यात असलेला फास जर घट्ट झाला, तर त्याला काही खाता येणार नाही. शिकारही करता येणार नाही. असाच तीन-चार दिवस राहिल्यास भुकेने मृत्युमुखी पडू शकतो.
तीन दिवसांपूर्वी एका वाघाच्या गळ्यात फास अडकल्याचे लक्षात आले. त्या वाघाचा शोध वरोरा वनविभागाची टीम घेत आहे. वाघाच्या गळ्यात असलेला फास हा नायलाॅनचा आहे. यामुळे वाघाला जीविताला धोका नाही. वाघ दिसताच त्याला बेशुद्ध करून त्याच्या गळ्यातील फास काढण्याचा आमचा प्रयत्न आहे.- एन. आर. प्रवीण,
मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर
