चंद्रपूर - मोदी सरकार सत्तेची सात वर्षे पूर्ण करत असताना कांग्रेस मोदी सरकत विरोधात आक्रमक झाली आहे. राज्यातील काँग्रेस नेते मोदी सरकारविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यात आलं आहे. इंधन दरवाढ, महागाई, बेरोजगारीसह विविध मुद्यांवरुन काँग्रेस राज्यभर आंदोलन केलं आहे.
मोदी सरकारला आपल्या सत्तेच्या दुसऱ्या कार्यकाळातील दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. तर एकूण कार्यकाळातील सात वर्ष पूर्ण झाली आहेत.
चंद्रपूर शहर कांग्रेस अध्यक्ष रामू तिवारी यांच्या नेतृत्वात आज शहरातील गिरनार चौकात मोदी सरकारच्या ७ वर्षाच्या कारकिर्दीविरोधात निदर्शने करण्यात आली.
वर्ष २०१४ ला पेट्रोल हे ७१ रुपये लिटर होत मात्र मोदी सरकार आल्यावर आज पेट्रोल ने शंभरी गाठली आहे, देशात महागाई गगनाला भिडली आहे, कोरोनामुळे लाखो नागरिकांचा जीव गेला मात्र मोदी सरकार या सर्व परिस्थीतीवर पूर्णपणे गाफील राहील.
आरोग्याच्या बाबतीत मोदी सरकारने ढिम्म नियोजन केल्याने नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. ७ वर्षाच्या कार्यकाळात देशात रोजगार असणारे बेरोजगार झाले.
मोदी सरकार म्हणजे भारत देशाला लागलेली साडेसाती अशी टीका चंद्रपूर शहर कांग्रेस अध्यक्ष रामू तिवारी यांनी केली.
निदर्शने आंदोलनात कांग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, अनुसूचित जाती कांग्रेस महाराष्ट उपाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, महिला कांग्रेस प्रदेश सचिव नम्रता ठेमस्कर, महिला कांग्रेस शहर अध्यक्ष सुनीता अग्रवाल, नगरसेवक सुनीता लोढिया, युवक कांग्रेस प्रदेश सचिव कादर शेख, इंटकचे केके सिंग, अल्पसंख्याक कांग्रेसचे सोहेल शेख आदींची उपस्थिती होती.


