चंद्रपूर :- शहरातील जयंत टॉकीजमागील रहिवासी, सिटी हायस्कूल मधील विद्यार्थीप्रिय शिक्षक घनश्याम उरकूडाजी रामटेके यांचे कोरोनाने नागपुरात खाजगी रुग्णालयात निधन झाले. मृत्यूसमयी ते 80 वर्षांचे होते. बौद्ध धर्माचे अभ्यासक म्हणून त्यांचा लौकिक होता. सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी वकिली पेशा स्वीकारत उत्तम जनसेवा केली. शहर जिल्ह्यातील बौद्ध धम्म संघटनांशी त्यांचा जवळचा संबंध होता. चंद्रपूर न. प. च्या माजी अध्यक्षा बीताताई रामटेके यांचे ते पती होते. त्यांच्या पश्चात 2 मुले सुना, नातवंडं व मोठा आप्तपरिवार आहे.
