ब्रह्मपुरी - मागील काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात वाढ होत आहे आतापर्यंत जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात २० नागरिकांचा बळी गेला आहे. मेंडकी येथील ४२ वर्षीय भाऊराव जांभुळे हा दक्षिण ब्रह्मपुरी वन क्षेत्र आवळगाव बिट येथे तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेला होता. त्यावेळी दबा धरून बसलेला वाघाने भाऊराव वर हल्ला केला या हल्ल्यात भाऊराव जांभुळे हे जागीच ठार झाले. हि घटना आज २६ मे ला सकाळच्या सुमारास घडली. ब्रह्मपुरी क्षेत्रात वाघाच्या दहशतीत ग्रामीण जगत असून वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी वनविभागाकडे केली आहे.

Tags:
Brahmapuri