घुघुस - घुगूस वणी मार्गावरील बंगाली कॅम्प जवळ रस्त्यावर उभे असलेल्या उभा ट्रकला चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी जोरदार होती की कार च्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या.
वाहन चालक हा गंभीर जखमी झाला असून त्याची परिस्थिती चिंताजनक आहे.
25 मे च्या रात्री 8 वाजेदरम्यान डग्गा चालक 30 वर्षीय संतोष रमेश किरार रा. गांधी नगर हा आपल्या नातेवाईकांची कार क्रमांक एमपी 28 CA 4873 ने वणी कडे जात होता, त्यावेळी घुग्गुस जवळील बंगाली कॅम्प मार्गावर उभा असलेला ट्रक क्रमांक एमएच 34 BG 6849 वर ती कार जोरदार धडक देत आदळली.
कार चालक संतोष ला घुघुस पोलिसांनी राजीव रतन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
मात्र त्याची परिस्थिती चिंताजनक असल्याने त्याला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घुग्गुस येथे मोठ्या प्रमाणात ट्रान्सपोर्ट व्यवसाय चालत असून वाहनाला पार्किंग ची व्यवस्था नसल्याने ते मुख्य मार्गावर उभे असतात, उभे असलेले ट्रक हे विना इंडिकेटर व मागील बाजूस रेडियम नसलेले असतात त्यामुळे रात्री हे ट्रक वाहन चालकांना दिसत नसल्याने हे अपघात घडत आहे.
चंद्रपूर परिवहन अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अपघातांची दखल घेत मार्गावर उभे असलेल्या ट्रक वर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतर्फे होत आहे.
