चंद्रपूर - वर्ष 2015 ला जिल्हा दारूबंदी घोषित करण्यात आला मात्र ही दारूबंदी अवैध धंदे करणाऱ्यासाठी जणू वरदानचं झाले.
महाविकास आघाडी ची सत्ता राज्यात आली, कांग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार हे जिल्ह्याचे पालकमंत्री बनले व लवकरच चंद्रपूर जिल्ह्याची दारू सुरू करू अशी घोषणा 3 ते 4 वेळा केली, ती घोषणा सध्या हवेत फिरत आहे.
यामुळे अवैध दारू तस्कर अधिक सक्रिय झाले पोलिसांनी सुद्धा अनेक कारवाया केल्या मात्र स्थिती कायम तशीच राहली.
शहरातील इंदिरानगर प्रभागात स्वामी विवेकानंद चौक, पंडित नेहरू शाळेजवळ वीरेंद्र साना, सचिन कुंभारे, वंदना कुंभारे, सुरेखा गाळेकर हे व्यक्ती मागील अनेक वर्षापासून अवैध दारूविक्रीचा व्यवसाय करीत आहे.
या अवैध दारू विक्रीमुळे परिसरात अनेक वाद निर्माण झाले, ज्यांनी ह्या अवैध विक्रेत्यांना हटकण्याचा प्रयत्न केला त्यांना मारहाण सुद्धा करण्यात आली, अवैध दारूविक्री ची अनेकदा पोलिसात तक्रार करण्यात आली मात्र कारवाई कधी झाली नाही.
त्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांची हिंमत वाढत गेली, आज सकाळी इंदिरानगर प्रभागातील महिला यांनी कांग्रेस नगरसेवक अमजद अली यांच्या नेतृत्वात दारूविक्री करणाऱ्याच्या घरावर हल्लाबोल केला.
कांग्रेस नगरसेवक अमजद अली यांनी ही अवैध दारूविक्री लवकर बंद करण्याची विनंती पोलिसांना केली कारवाई न झाल्यास आम्ही या दारूविक्रेत्याना झोडपून काढू असा इशारा सुद्धा अली यांनी यावेळी दिला.
सदर अवैध दारू विक्रेत्यांचे रामनगर पोलीस स्टेशनमधील काही कर्मचाऱ्यांसोबत हितसंबंध असून ते दरमहिन्याला या अवैध दारू विक्रेत्यांकडे येत असतात अशी माहिती सुद्धा महिलांनी यावेळी दिली.
नगरसेवक अमजद अली यांनी यावर आळा घालण्याची मागणी केली अन्यथा अवैध दारूविक्री करण्याची आम्हाला सुद्धा परवानगी द्या, लॉकडाउन मध्ये आम्ही सर्व रस्त्यावर दारूविक्री करणार असल्याचे सांगितले.
जिल्ह्यात पोलीस प्रशासन वारंवार अवैध दारू तस्करांच्या मुसक्या आवळत असले तरी असे अनेक अवैध विक्री करणारे आहे त्यांच्याकडे मात्र जाणून दुर्लक्ष पोलीस प्रशासन करीत आहे.
विशेष म्हणजे दारूबंदी जिल्ह्याचे पालकत्व घेतलेल्या पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नगरसेवकाच्या प्रभागात जर ही परिस्थिती असेल तर जिल्ह्यातील चित्र किती विदारक आहे याची कल्पना नागरिकांना कदाचित माहीत असेलचं.
