गोंदिया- नागालँडमध्ये झालेल्या चकमकीत गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील परसोडीचे जवान प्रमोद विनायक कापगते यांना वीरमरण आलं आहे. शहीद प्रमोद कापगते हे केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत होते. नागालॅंड बॉर्डरवर सकाळी झालेल्या चकमकीत गोळी लागून ते शहीद झाले. प्रमोद कापगते हे भाजपचे ज्येष्ठ नेते विनायक कापगते यांचे सुपुत्र होते. शहीद प्रमोद यांचे पार्थिव त्यांचे मूळ गाव परसोडी गुरुवारी इथं सकाळी 8 वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. प्रमोद कापगते शहीद झाल्यानं परसोडी गावावर शोककळा पसरली आहे.
महत्वाची बाब म्हणजे त्यांचा सीआरपीएफमधील 20 वर्षांचा बाँड 15 दिवसांनी पूर्ण होत होता. मात्र मंगळवारी सकाळी नागालँड बॉर्डरवर झालेल्या चकमकीत ते गोळी लागून शहीद झाले. शहीद प्रमोद कापगते यांच्य पश्चात पत्नी वंदना कापगते, मुलगा कुणाल, भाऊ राजेश कापगते आणि मोठा परिवार आहे. शहीद प्रमोद यांचे पार्थीव गुरुवारी सकाळी 8 वाजता परसोडी इथं दाखल होणार आहे. गुरुवारीच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
