यवतमाळ- संपूर्ण महाराष्ट्रात कोविड आजाराचे थैमान घातल्याने शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण लाॅकडाऊन जाहिर केला आहे. या काळात जीवाची पर्वा न करता डाॅक्टर्स, परीचारीका, सफाई कामगार, रुग्णवाहीका चालक अविरत आपली सेवा देत आहे.
वणी तालुक्यातील कायर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, झरी-जामणी तालुक्यातील झरी कोविड केअर सेंटर, पाटण कोविड सेंटर आणि मुकुटबन येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पूर्व केंद्रिय गृहराज्यमंत्री तथा भाजपा ओबीसी मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहीर व वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी भेट दिली.
यावेळी कोविड काळात रुग्ण तपासणी, विविध वयोगटातील नागरीकाचे लसीकरण, कोविड रुग्णांवर उपचार अशा सतत सेवा देणारे डाॅक्टर्स व परीचारीका तसेच सफाई कामगार, रुग्णवाहीका चालक यांचा हंसराज अहीर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी कोविड लसीकरण व कोविड रुग्णंाची माहिती घेतली तसेच नागरीकांना लसीकरण करुन घेण्यासाठी जनतेमध्ये जनजागृती करण्याच्या सुचना अहीर यांनी केल्या व लस अत्यंत सुरक्षित असून नागरीकांनी न घाबरता लसीकरण करुन कोविड आजारापासून बचाव करण्याचे आवाहन ही त्यांनी नागरीकांना केले.
या प्रसंगी भाजपा भाजपा जिल्हा महामंत्री रवि बेलुरकर, उपाध्यक्ष संजय पिंपळशेंडे, माजी जिल्हा सरचिटणीस दिनकर पावडे, जिल्हा सचिव किशोर बावणे, तालुका अध्यक्ष गजानन विधाते, भाजयुमो जिल्हा सरचिटणीस नितीन वासेकर, सरपंच कायर तसेच झरी तालुक्यातील पंचायत समिती सभापती राजेश गोड्रावार, सतिष नाकले, जि.प. सदस्य सुरेश मानकर, राम आईतवार, अशोकरेड्डी बोदकुरवार, मुन्ना बोलेनवार, झरी, पाटण, मुकुटबन येथील सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी व कार्यकर्ते आदिं ची उपस्थिती होती.


