चिमूर - शहरापासून पाच किमी अंतरावर असलेल्या कवडसी जंगलात मोहा हातभट्टीची दारु काढत असल्याची गुप्त माहीती उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन बगारे पोलीस निरिक्षक रविंद्र शिंदे पोलीस उप निरीक्षक मंगेश मोहोड यांना मिळाली त्यानुसार पोलीसांनी जंगलाच्या दिशेने मोर्चा वडवीला अवैध हातभट्टी दारू विक्रेत्याला पोलीसांची चाहुल लागताच त्याने जंगलातुन पळ काढला पोलीसांनी घटना स्थळावरचे सर्व साहीत्यासह 4 लाख 62 हजार नऊशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपी राहुल रामटेके व प्रशांत शंभरकर रा कवडसी यांचेवर दारूबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करन्यात आला दरम्यान घटना स्थळावर 150 लीटर मोहादारू किमंत 1,80000 रुपये मोहा सडवा किमंत 2,66000 रुपये व मोहादारू काढन्याकरीता लोखंडी शेगड्या, प्लास्टीक ड्रम जर्मन कुंडे, लोखंडी पिपे इ साहित्य किमंत 16900 एकुन 4 लाख 62 हजार नऊशे रुपयाचा मुद्देमाल मिळाला.
      जंगल परिसरातील हातभट्टीवर पोलीसांच्या अनेक कारवाया होत आहे मात्र शहरात पोलीसांना माहीत असताना सांगीतल्या प्रमाणे एखादी कारवाई होते.
शहरातही अनेक अवैध दारु विक्री केंद्र आहेत या कडे लक्ष देन्याची गरज चिमूर पोलीसांना आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन बगाटे यांच्या नेतृत्वात पोलीस निरिक्षक रविंद्र शिंदे पोलीस उपनिरीक्षक मंगेश मोहोड, कैलास आलाम, प्रविण गोन्नाडे, मनोज ठाकरे, शंकर बोरसरे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
