चंद्रपूर/ताडोबा - बोटेझरी येथे हत्ती छावणीत असलेला गजराज नावाचा नर हत्ती आज संध्याकाळी अचानक आक्रमक झाला. या वस्तुस्थितीची माहिती नसताना कोळसाचे एसीएफ श्री. कुलकर्णी आणि मुख्य लेखापाल श्री गौरकर हे त्याच भागात फिरत होते. त्यांचे वाहन चिखलात अडकले आणि जवळच हत्तीकडे पाहत त्यांनी वाहन सोडले. यामध्ये हत्तीने दोघांवर हल्ला केला आणि दुर्दैवाने टीएटीआरचे मुख्य लेखापाल श्री. गौरकर या घटनेत मरण पावले. रॅपिड रिस्पॉन्स टीम आणि पशुवैद्यकिय आणि टीएटीआरचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि हत्तीला शांत आणि संयमित ठेवण्यासाठी ऑपरेशन सुरू केेले आहे. 
गावातील नागरिकांना हत्तीपासून सावध राहण्याच्या सूचना देण्यात देण्यात आल्या आहेत. हत्तीला पकडण्यासाठी आणि यापुढे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत.
