गडचांदूर/सै.मूम्ताज़ अली:-
कोरोनाची दुसरी लाट जनतेच्या जिव्हारी लागत असून दिवसेंदिवस याचा प्रादुर्भाव वाढतच आहे.याला रोखण्यासाठी शासन कसोशीने प्रयत्न करीत आहे.याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ठिकठिकाणी "कोविड लसीकरण केंद्र" सुरू करण्यात आले आहे.याच श्रेणीत चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या कोरपना तालुक्यातील गडचांदूर,कोरपना,नारंडा, कवठाळा येथे सदर केंद्र सुरू करण्यात आले असून अंदाजे २० हजाराच्यावर लोकसंख्येच्या नांदा येथे सदर केंद्र सुरू करण्यात आले नाही.नांदा लगत अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आहे.
तसेच जवळच आवाळपूर,बिबी अशी मोठमोठी गावे आहे.याठिकाणी लसीकरण केंद्र नसल्याने गावाऱ्यांना तसेच अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या बहुतेक कामगारांना डिव्टी बुडवून गडचांदूर व कवठाळा येथे जाणे आणि रांगा लावून लस टोचून घेणे शक्य होत नसल्याचे बोलले जात आहे.अशा परिस्थितीत जर नांदा किंवा बिबी गावात कोविड लसीकरण केंद्र सुरू केल्यास या सर्वांना लस घेणे अत्यंत सोईस्कर होईल यात काही शंका नाही. करीता बिबी किंवा नांदा या गावात त्वरित कोविड लसीकरण केंद्र सुरु करावे अशी मागणी माजी पं.स.सभापती संजय मुसळे,गडचांदूर भाजप शहराध्यक्ष सतीष उपलेंचिवार,भाजपा नेते निलेश ताजने,गडचांदूर न.प.नगरसेवक अरविंद डोहे,महेश घरोटे यांनी तालुका आरोग्य अधिकारी मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
