घुग्गुस - पैनगंगा खुल्या कोळसा खाणीत अनेक दिवसांपासून ट्रक चालक मालकांकडून अवैध वसुलीचे प्रकार सुरू आहे, याबाबत जर कुणी आवाज उचलण्याचा प्रयत्न केला तर त्याला कोळसा वाहतूक करण्यासाठी अनेक त्रासांचा सामना करावा लागतो.
नव्यानेच उदघाटन झालेल्या पैनगंगा खुली कोळसा खाण ही अनेक वादात आहे.
या खाणीत दररोज 200 ट्रक कोळशाची वाहतूक होत असते, मात्र ही वाहतूक करण्यासाठी अनेकांचे खिशे भरावे लागत असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे.
ज्यावेळी ट्रक या कोळसा खाणीत प्रवेश करतो त्यावेळी सर्वांचे टोकन क्रमांक दिल्या जाते मात्र टोकन बनविण्यासाठी सुद्धा ट्रक चालकांना वेकोली सुरक्षा रक्षकाला पर ट्रक 50 रुपये द्यावे लागतात, त्यानंतर ट्रक मध्ये कोळसा लोड करण्यासाठी खाजगी कम्पणीच्या लोडिंग मशीन ऑपरेटरला 100 रुपये ट्रक व कोळश्याने भरलेल्या ट्रक चे वजन करण्यासाठी काट्यावर असलेले वेकोली अधिकारी यांना प्रति ट्रक 50 रुपये द्यावे लागतात.
दररोज 200 प्रमाणे 40 हजार रुपयांची अवैध वसुली या कोळसा खाणीत सुरू असते.
मात्र वेकोली तर्फे खाणीच्या बाहेर आमच्या क्षेत्रात कुणीही अवैध पद्धतीने पैसे मागितल्या जात नाही असे फलक लावले आहे, पण वेकोलीचे काही अधिकारी या नियमांना तिलांजली देत ट्रक चालकांकडून अवैध वसुली करीत असतात.
आधीच डीझलचे दर गगनाला भिडले आहे, त्यातच ट्रकचे मेंटनन्स, चालकाचा पगार द्यायला सुद्धा ट्रक मालकांकडे निम्मे पैसे वाचतात त्यामधून त्यांना आपल्या परिवाराचा सांभाळ करावा लागतो.
ट्रक चालकांकडून वेकोली व खाजगी लोडिंग मशीन ऑपरेटर तर्फे होणारी लूट थांबवावी अशी चर्चा वाढत असून वेकोलीने सुरक्षा रक्षक, काटा बाबू यांचेवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे.