(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही - सिंदेवाही पोलीस स्टेशन मध्ये कलम 318 भादवी दिनांक 24/04/21 प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. मौजा चिटकी तालुका सिंदेवाही येथील रहिवाशी शेख रिजवान मजीद यांचे शेतशिवारातील विहिरीमध्ये अनोळखी नवजात अर्भक मृत अवस्थेत मिळून आले होते. सदर मृत अर्भकाच्या शवविच्छेदन करून पंचनामा करण्यात आलेला होता. मृत अर्भक ची बॉडी पूर्णपणे डिकंपोज झाल्याने वैद्यकीय अधिकारी यांनी सदर अर्भक हे स्त्री जातीचे असल्याचे सांगितलेले होते. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सिंदेवाही पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवून वेगाने तपास सुरू केला.
माननीय एस डी पी ओ सा.ब्रह्मपुरी यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार योगेश घारे, पीएसआय नेरकर व पोलीस पथक यांनी नमूद गुन्ह्यांमध्ये मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तपास करून अथक परिश्रम व मेहनत घेऊन अज्ञात आरोपी महिलेचा अल्पावधीमध्येच शोध लावून सदर गुन्हा उघडकीस आणलेला आहे. महिला आरोपी हिने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने तिला पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे.
पुढील तपास सुरू आहे. सिंदेवाही पोलिसांच्या यशामुळे नागरिकांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
