Prashant Gedam
विदर्भात ज्यावेळी कोरोना झपाट्याने वाढत होता त्यावेळी सुद्धा या परिस्थितीवर मंत्र्यांनी दुर्लक्ष केले, आज ऑक्सिजन, बेड, रेमडीसीविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असून ऑक्सिजन अभावी नागरिक मृत्यूच्या दाढेत जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव ज्यावेळी वाढला त्यावेळी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी उपाययोजना करायला हव्या होत्या मात्र तसे काही झाले नाही.
जिल्ह्यातील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे, नेमकं या परिस्थितीत पालकमंत्री वडेट्टीवार हे ऑक्सिजन प्लांट लावण्याच्या घोषणा करीत आहे, मात्र त्यांच्या विधानसभा क्षेत्रात लक्ष नसल्याने भाजप आमदार बंटी भांगडीया यांनी मदतकार्य सुरू केले.
सिंदेवाही तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व जिल्हा प्रशासनाच्या वतीने सापत्न वागणूक व ऑक्सिजन अभावी मृत्युदर आटोक्यात येत नसतांना आ. बंटी भांगडीया यांच्यातर्फे स्वखर्चातून सिंदेवाही येथील कोविड केअर सेंटर ला तात्काळ २ जंबो ऑक्सिजन सिलिंडरची मदत करण्यात आली.
यावेळी सिंदेवाही नगरपंचायत सदस्य हितेश भाऊ सुचक , हार्दीक सुचक , विपुल धमेजा , राहुल कावले , कुणाल पेरशेट्टीवार उपस्थित होते.
